sindhudurg: वेंगुर्ला शहरातील ज्येष्ठ वारकरी विजय गुरव यांना सकलसंत गाथेची भेट

0
41

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील ज्येष्ठ वारकरी तसेच श्री रामेश्वर भजन मंडळाचे बुवा विजय गुरव यांना कार्तिक एकादशीनिमित्त भुजनागवाडी भजन मंडळातर्फे विविध अभंगांचा समावेश असलेल्या ‘सकलसंत गाथा‘ या पुस्तकेची प्रत भेट देऊन सन्मान करण्यात आाला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमित/

ग्रामदैवत श्री रामेश्वर देवस्थानचे पूर्वीचे व्यवस्थापक कै. काका गुरव यांचे सुपुत्र विजय गुरव हे गेली ५० वर्षे भजन या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक लहान मुलांना, तरुणांना भजन क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन करताना त्यांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच श्री. गुरव यांची शहरातील रामेश्वर मंदिर, भुजनागवाडी विठ्ठल मंदिर, वेंगुर्ला बसस्थानकावरील साई मंदिर आणि कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात उत्सव कालावधीत भजन सेवा सुरु असते. त्यांची भजन सेवा याहीपुढेही अखंड सुरु रहावी, त्यांच्या भजनातील अभ्यासाचा इतरांना उपयोग व्हावा यासाठी भुजनागवाडी भजन मंडळातर्फे ‘सकलसंत गाथा‘ या पुस्तकेची प्रत भेट देण्यात आली.

भुजनागवाडी येथील विठ्ठल मंदिरात आज कार्तिकी एकादशीदिवशी पहाटेची काकड आरती संपल्यावर हा पुस्तक भेट कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भुजनागवाडी भजन मंडळाचे दिगंबर किनळेकर, रमण किनळेकर, रुपेश माडकर, शैलेश मयेकर, सतेज मयेकर, जयराम वायंगणकर, हर्षांग माडकर यच्यासह बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

फोटोओळी – भुजनागवाडी भजन मंडळातर्फे विजय गुरव यांना सकलसंत गाथेची भेट देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here